‘हसीना वि. करिष्‍मा’, ‘मॅडम सर’मध्‍ये कोण ठरणार सर्वोत्तम एस.एच.ओ?

आपल्‍या सर्वोत्तम अभिनयाने सर्वांची मने जिंकलेल्‍या सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मधील चार महिला पोलिस अधिकारी त्‍यांच्‍या अद्वितीय पोलिस कर्तव्‍यांसह प्रेक्षकांचे छान मनोरंजन करत आहेत. आपल्‍या अनोख्‍या पद्धतीने अनेक अवघड केसेसचे निराकरण केलेली करिष्‍मा सिंग (युक्‍ती कपूर) आता लाडकी हसीना मलिकसह (गुल्‍की जोशी) लखनौमधील महिला पोलिस थानाची एस.एच.ओ (स्‍टेशन हाऊस ऑफिसर) बनली आहे. पोलिस स्‍टेशनमध्‍ये आता दोन एस.एच.ओ. आहेत आणि दोघीही त्‍यांच्‍या विभिन्‍न विचारसरणींमधून केसेस सोडवण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत.

करिष्‍मा ही तात्‍पुरत्‍या कालावधीसाठी एस.एच.ओ. आहे. ती हसीनापेक्षा तिचे पोलिसी कर्तव्‍य उत्तम असण्‍याचे सिद्ध करण्‍यासाठी कोणतीच कसर सोडणार नाही. पोलिस स्‍टेशनमध्‍ये नवीन केस आली असल्‍यामुळे करिष्‍मा व हसीनाला त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या अनोख्‍या पद्धतीने केस हाताळण्‍याची संधी मिळाली आहे. दोन सोशल मीडिया सेलिब्रिटीज एकमेकांच्‍या गोष्‍टी चोरण्‍याचा आरोप करतात आणि यामागील सत्‍य शोधण्‍याची जबाबदारी आता दोन्‍ही एस.एच.ओ.वर आहे. चोरांची प्रेस कॉन्‍फरन्‍स आयोजित करणारी करिष्‍मा तिच्‍या पद्धतीने चोराला ओळखण्‍यामध्‍ये असमर्थ ठरते आणि हसीना त्‍यानंतर भार सांभाळते. ती एक पार्टी आयोजित करते, ज्‍यामध्‍ये तिला खरा चोर येण्‍याची अपेक्षा असते, पण काहीतरी अनपेक्षित घडते.

त्‍यांना चोर मिळेल का की त्‍यांच्‍यामधील स्‍पर्धेमुळे पोलिस स्‍टेशनमध्‍ये समस्‍या निर्माण होईल?

करिष्‍मा सिंगची भूमिका साकारणारी युक्‍ती कपूर म्‍हणाली,”प्रेक्षकांना धमालमनोरंजन पाहायला मिळणार आहे. पोलिस स्‍टेशनमध्‍ये आता दोन एस.एच.ओ. आहेत. करिष्‍मा व हसीनाची विचारसरणी नेहमीच विशिष्‍ट व एकमेकांपेक्षा वेगळी राहिली आहे. त्‍या दोघीही त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या पद्धतीने केसेस सोडवण्‍याचा प्रयत्‍न करतात आणि कधी-कधी त्‍यांना एकमेकींचे म्‍हणणे पटते. पण आता करिष्‍मा देखील तात्‍पुरत्‍या कालावधीसाठी एस.एच.ओ. बनली असल्‍यामुळे ती हसीनासोबत स्‍पर्धा करत तिची केस सोडवण्‍याची पद्धत उत्तम असण्‍याचे सिद्ध करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे. ती यामध्‍ये यशस्‍वी होते की नाही, हे प्रेक्षकांना अत्‍यंत मनोरंजनपूर्ण असलेल्‍या आगामी एपिसोड्समध्‍ये पाहायला मिळेल.”

हसीना मलिकची भूमिका साकारणारी गुल्‍की जोशी म्‍हणाली,”हसीनाचा अहिंसक मार्गाने केसेस सोडवण्‍यावर विश्‍वास आहे, तर करिष्‍माची विचारसरणी तिच्‍या अगदी विरूद्ध आहे. आता करिष्‍मा हसीनासोबत तात्‍पुरत्‍या कालावधीसाठी एस.एच.ओ. बनली असल्‍यामुळे दोघीही कोणाचे पोलिसी कर्तव्‍य उत्तम आहे हे सिद्ध करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहेत. कधी-कधी दोघींना एकमेकींचे म्‍हणणे पटते. ही स्‍पर्धा नीट पार पडेल की काही समस्‍या निर्माण होतील हे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्‍यंत रोमांचक असणार आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: