कोरोना – राज्यात आज १६ हजार नव्या रुग्णांची नोंद

पुण्यात 1036 रुग्णांची वाढ

मुंबई – महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत तब्बल १६ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर, ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६ हजार १०४ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांची संख्या १४ लाख ९२२ वर पोहोचली आहे. यामध्ये ३७ हजार ०५६ जणांचा मृत्यू झालाय तर, ११ लाख ०४ हजार ४२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या २ लाख ५९ हजार ००६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात १०३६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ११७० रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात ६० करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १८ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ९३२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५१२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १४६३२७.
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १६३६९.
  • एकूण मृत्यू -३५२८.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १२६४३०.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५२६०.

Leave a Reply

%d bloggers like this: