Friday, June 19, 2026
PUNE

गंभीर काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून गरजूंना मदत करणे कौतुकास्पद -मंगेश गोळे

पुणे- सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी कोरोना विरुद्ध आपल्या क्षमतेने केलेली मदत व सहकार्य यामुळे अनेकांना बहुमोल सहकार्य झाले. या गंभीर काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून गरजूंना मदत करणे हे काम नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मंगेश गोळे यांनी व्यक्त केले. पुणे मल्टीपल निधी लिमिटेड यांच्यावतीने लॉकडाऊन काळात नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा नुकताच कर्मवीर कोरोना योद्धा पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कोरोना महाभयंकर आजाराच्या गंभीर परिस्थितीत लॉकडाऊन काळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे मल्टीपल निधी चे चेअरमन आसिफ मोमीन होते. पुणे मल्टीपल निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजूना आर्थिक मदत करून रोजगार तसेच त्यांची इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच पुणे मल्टिपल निधीच्या माध्यमातून कोरोना आजाराच्या काळात काम करणाऱ्या सर्वसामान्य घटकातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे आसिफ मोमीन यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading