Thursday, June 18, 2026
PUNE

सोशल मीडियावर संविधान विरोधी वक्तव्य करून सामाजिक भावना भडकवणाऱ्या युवका विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे- सोशल मीडियावर संविधान विरोधी वक्तव्य करून सामाजिक भावना भडकवणाऱ्या युवका विरुद्ध मंगळवारी (दि. 25 ऑगस्ट) रोजी रात्री येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी प्रमोद मोरे (वय 28 रा. रामनगर येरवडा) याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली.
सोमवारी (दि. 24) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील एका तरुणाने भारतीय संविधान विरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. सदरचा मजकूर वाचल्यानंतर येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय बाराथे यांच्यासह परिसरातील विविध संस्था संघटनांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी या गंभीर घटनेची माहिती सगळीकडे पसरली. पुणे शहरातील अनेक फुले, शाहू, आंबेडकरी पुरोगामी व संविधान मानणाऱ्या पक्ष व संस्था संघटनांनी याप्रकरणी तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून भारतीय दंडविधान संहिता 1860 चे कलम 505(2) व राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे (कलम 2)नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्यामुळे काही काळ येरवडा पोलीस स्टेशन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेरीस रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे येरवडा कृती समिती, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भीम आर्मी, भीमशक्ती संघटना, लष्कर-ए -भिमा, प्रबुद्ध भारत प्रतिष्ठान, हमारी अपनी पार्टी यांच्यासह विविध संस्था, संघटनांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. या गंभीर प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी सह सर्व संस्था संघटनांचे प्रतिनिधी यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading