Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक; राज्यात १ लाख ६५ हजार ९२१ ॲक्टिव्ह रुग्ण

पुणे दिवसभरात 1204 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

मुंबई, दि.२५: राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १०,४२५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२९ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :
मुंबई मनपा-५८७ (३५), ठाणे- १०५ (३), ठाणे मनपा-१४३ (९), नवी मुंबई मनपा-३०२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-९४ (२), उल्हासनगर मनपा-१३ (५), भिवंडी निजामपूर मनपा-१३, मीरा भाईंदर मनपा-९२ (४), पालघर-८६, वसई-विरार मनपा-५५ (३), रायगड-१४८ (३५), पनवेल मनपा-६९, नाशिक-१७० (१), नाशिक मनपा-६७५ (७), मालेगाव मनपा-५, अहमदनगर-२५६ (५),अहमदनगर मनपा-२०६ (३), धुळे-३६, धुळे मनपा-६ (१), जळगाव- ४७६ (६), जळगाव मनपा-१४३ (६), नंदूरबार-१०७, पुणे- ४५८ (१३), पुणे मनपा-१२२८ (३६), पिंपरी चिंचवड मनपा-८४२ (९), सोलापूर-३०५ (२), सोलापूर मनपा-४० (२), सातारा-४८९ (८), कोल्हापूर-३५८ (२०), कोल्हापूर मनपा-१३२ (१७), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२२९ (१०), सिंधुदूर्ग-७४, रत्नागिरी-४६, औरंगाबाद-१७४ (६),औरंगाबाद मनपा-२३७ (१५), जालना-३२ (१), हिंगोली-६, परभणी-५०, परभणी मनपा-३३ (१), लातूर-८१(६), लातूर मनपा-८४ (२), उस्मानाबाद-१०५ (७),बीड-१२२ (३), नांदेड-१२९, नांदेड मनपा-१४ (१), अकोला-२२ (१), अकोला मनपा-१४, अमरावती-४२, अमरावती मनपा-४०, यवतमाळ-८४, बुलढाणा-२७ (१), वाशिम-७, नागपूर-१८४ (३), नागपूर मनपा-६०५ (२१), वर्धा-५०(१), भंडारा-४९ (२), गोंदिया-३४, चंद्रपूर-४२ (१), चंद्रपूर मनपा-३० (१), गडचिरोली-२४, इतर राज्य ७.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख २४ हजार ९११ नमुन्यांपैकी ७ लाख ०३ हजार ८२३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८९ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ५३ हजार २७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

पुणे शहर ..!

  • दिवसभरात 1204 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 1123 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 44 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 85700

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 14723

  • एकूण मृत्यू – 2077
  • एकूण डिस्चार्ज- 68900

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading