Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENT

सुशांत सिंह च्या जीवनावरील चित्रपटाद्वारे श्वेता पराशरचे हिंदीत पदार्पण

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूविषयी वादाचे मोहोळ उठले असताना आणि त्याचा मृत्यू म्हणजे ‘खून की आत्महत्या’ याविषयी देशभर जोरदार चर्चा झडत असताना आता सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावर एक चित्रपट येत असून, या चित्रपटाद्वारे तेलुगू मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता पराशर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘सुसाईड आँर मर्डर” असे या सिनेमाचे नाव असून त्यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या गूढ मृत्यूविषयी एक मोहीम चालवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये एका नकारात्मक भूमिकेमध्ये (ट्रबलमेकर) श्वेता पराशर दिसणार आहे. यासंदर्भात श्वेता पराशर ने संवाद साधला. त्यावेळी ती म्हणाली की तेलुगु सिनेसृष्टीतून हिंदीमध्ये पदार्पण करतानाचा प्रवास अतिशय मोहक आणि रंजक असून नवी आव्हाने आणि एका नव्या मोठ्या पटलावर प्रदर्शित होण्याची संधी मला मिळते आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून माझ्या विशेष अपेक्षा आहेत. सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना त्या विषयावर चित्रपट येणे आणि त्यामध्ये या गुणी आणि दिवंगत अभिनेत्याच्या बाजूने आपली मते मांडता येणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
श्वेता पराशर तेलुगू मधील आघाडीची नायिका असून आता तिचे काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. ‘सुसाईड आँर मर्डर’ हा चित्रपटही साधारणपणे डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून श्वेता पराशर म्हणाली की, या चित्रपटाद्वारे सुशांत सिंग राजपूत चे जीवन सर्वसामान्य लोकांना समजणार असून त्याद्वारे एका दुर्लक्षित पण सकस अभिनेत्याचा परिचय सिनेरसिकांना होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading