Wednesday, September 2, 2026
PUNE

‘दगडूशेठ’ च्या श्रीं समोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम

पुणे : ओम नमस्ते गणपतये… चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर यंदा देखील निनादले. एरवी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे ३४ वे वर्ष आहे.

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच गणेशाची आरती देखील करण्यात आली.

उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.  

श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.comhttp://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.   

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading