NEW SHOW – ‘तेरा यार हूं मैं’
मुलासाठी पहिला हिरो म्हणजे त्याचे वडिल. पण हा हिरो त्याचा मित्र देखील बनू शकतो का? मित्र बनवण्याच्या प्रयत्नात वडिल व मुलामधील नाते बिघडून जाईल की अधिक संपन्न होईल? सोनी सबवरील नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं’ हलक्या-फुलक्या पद्धतीने भारतीय कौटुंबिक पार्श्वभूमी सादर करत या आधुनिक दुविधेचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते. या मालिकेमध्ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे सुदीप साहिर, राजेंद्र चावला, श्वेता गुलाटी, अंश सिन्हा, मेघन जाधव, जया ओझा. ही मालिका सुरू होत आहे ३१ ऑगस्ट २०२० पासून रात्री ९ वाजता फक्त सोनी सबवर.
शशी सुमीत प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेली मालिका ‘तेरा यार हूं मैं’जयपूरमधील बंसल कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे. मालिका बदलता काळ आणि कुटुंबातील प्रत्येक पिढीवर बदलत्या काळाचा होणारा परिणाम यामधून प्रेरणा घेते. राजीवला (सुदीप साहिर) त्याचे वडिल, कुटुंबप्रमुख प्रताप बंसलसोबत (राजेंद्र चावला) खुले व मैत्रीपूर्ण नाते नसल्याचे दु:ख आहे आणि तसे त्याचा किशोरवयीन मुलगा रिषभच्या (अंश सिन्हा) बाबतीत घडू नये असे त्याची इच्छा आहे. आजच्या काळाशी जुळवून घेत त्याच्या मुलाच्या जीवनाचा भाग होण्यास उत्सुक असलेला तो वास्तविक व आभासी जीवनात त्याचा मित्र बनण्याचा निर्धार करतो. पण रिषभची वडिलांच्या रूपात मित्र असण्यासाठी अनिच्छा आणि वाटणारी लाज यामुळे राजीव माघार घेतो.रिषभ त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करतो आणि त्यांचा आदर देखील करतो. पण त्याला ते फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित ठेवायचे आणि त्याची जीवनामध्ये जिज्ञासू ‘मित्र’ असण्याची इच्छा आहे.
मालिका प्रेक्षकांना प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये घडणा-या घटनांशी संबंधित व त्यामधून प्रेरणा घेतलेल्या परिणामांच्या शृंखलेमध्ये वडिलांच्या आपल्या मुलाला मित्र बनवण्याच्या प्रयत्नांप्रती मुलाच्या प्रतिक्रियेला दाखवणार आहे. मालिकेची लक्षवेधक कथा वडिल-मुलाच्या नात्यावर लक्ष केंद्रित करते. मालिका ‘तेरा यार हूं मैं’मध्ये आधुनिक, पण पुराणमतवादी भारतीय कुटुंबाचे परिपूर्ण संयोजन आहे. ही मालिका संपूर्ण कुटुंबाला आकर्षून घेणा-या सोनी सबच्या हलक्या-फुलक्या व मूल्याधारित मालिकांच्या प्रबळ ऑफरिंग्जमधील नवीन भर आहे.
