पुण्यात कोविड-१९ सॅम्पल कलेक्शनसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग सेवा
● पुण्यातील ग्राहक कोविड-१९ चाचणीसाठी नमुना घेण्याकरिता व्हीएफएस ग्लोबल वेबसाइटवरून ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकतात, आणि नियुक्त प्रमाणित वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये हे सॅम्पल देऊ शकतात
● ग्राहक अधिक सुरक्षितता व सोयीसाठी ‘अॅट युअर डोअरस्टेप’ सॅम्पल कलेक्शन सुविधेचा पर्यायही निवडू शकतात
सीमा खुल्या होऊ लागल्या आहेत आणि प्रवासावरील निर्बंध हळूहळू शिथिल होऊ लागले आहेत, त्यामुळे काही देशांनी सोयीस्कर व भरवशाच्या प्रस्थानपूर्व (प्री-डिपार्चर) कोविड-१९ चाचण्या यापूर्वीच सक्तीच्या केल्या आहेत, तर प्रवाशांच्या आगमनानंतर चाचण्या करण्याचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने काही देश येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हा नियम अमलात आणण्याबद्दल विचार करत आहेत.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी व्हीएफएस ग्लोबलने कोविड-१९ आरटी-पीसीआर सॅम्पल कलेक्शनची ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग सेवा सुरू केली आहे. ही सेवा पुण्यातील ग्राहकांसाठी आजपासून उपलब्ध आहे. भारत सरकारने मान्यता दिलेल्या प्रमाणित वैद्यकीय प्रयोगशाळांच्या नेटवर्कशी सहयोग करून ही सेवा देऊ केली जात आहे. या सर्व प्रयोगशाळांकडे कोविड-१९साठी स्वॅब घेण्याकरिता लागणारी आवश्यक ती अधिमान्यता आहे.
ग्राहक व्हीएफएस ग्लोबलच्या वेबसाइटवरून (https://www.vfsglobal.com/en/individuals/covid-test.html) ऑनलाइन बुकिंग करू शकतात आणि नियुक्त सहयोगी वैद्यकीय प्रयोगशाळेत सॅम्पल देऊ शकतात. याशिवाय सुरक्षितता व सोयीच्या दृष्टीने ग्राहकाच्या घरातूनच सॅम्पल घेणे शक्य करण्यासाठी ‘अॅट युअर डोअरस्टेप’ हा सेवेचा पर्याय उपलब्ध आहे.
ही सेवा आणखी १० शहरांमध्ये उपलब्ध आहे. ती शहरे पुढीलप्रमाणे – दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, चंडीगढ, चेन्नई, जालंधर, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोची.
ही सेवा कोण उपलब्ध करून घेऊ शकते?
कोविड-१९ आरटी-पीसीआर सॅम्पल कलेक्शन सेवा ही सर्वांसाठी उपलब्ध आहे. ती प्रवाशांपुरती मर्यादित नाही. कोविड-१९ची लक्षणे दिसणारे किंवा न दिसणारेही ही सेवा उपलब्ध करवून घेऊ शकतात. राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करून ही सेवा दिली जाईल.
या सेवेबाबत मदत करण्यासाठी व्हीएफएस ग्लोबल सेंटर निवडण्यासाठी व्हीएफएस ग्लोबलच्या ग्राहकांना एक समर्पित हेल्प डेस्कही पुरवण्यात आला आहे.
कोविड–१९ आरटी–पीसीआर सॅम्पल कलेक्शन सेवेसाठी अर्ज करण्याकरिता पायऱ्या:
पायरी १– अपॉइंटमेंटची वेळ ऑनलाइन ठरवा (अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी Click here)
पायरी २– तपशील द्या आणि पेमेंट पूर्ण करा: तुमचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट क्रमांक आणि व्यक्तिगत माहिती पुरवा आणि त्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करा.
पायरी ३– नमुना द्या आणि रिपोर्ट प्राप्त करा: निश्चित तारखेला, वेळी आणि स्थळी सॅम्पल द्या.
महत्त्वाचे फायदे:
● विनासायास ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग व्यवस्था आणि सोयीस्कररित्या नमुने घेतले जाणे
● सोय आणि सुरक्षिततेसाठी सर्व शहरांमध्ये ‘अॅट युअर डोअरस्टेप’ सॅम्पल कलेक्शन सेवा
● रिपोर्ट तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर गोपनीयरित्या पाठवला जातो
● आयसीएमआर आणि आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या सॅम्पल कलेक्शन प्रक्रिया
दक्षिण आशिया, मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि अमेरिका विभागाचे प्रादेशिक समूह सीओओ विनय मल्होत्रा या सेवेबद्दल म्हणाले, “सोयीस्कर आणि खात्रीशीर प्रस्थानपूर्व कोविड-१९ नमुने संकलन/चाचणी सेवा ही आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रक्रियेत संप्रेरकाची भूमिका निभावू शकेल असे आम्हाला वाटते. यामुळे गंतव्य (डेस्टिनेशन) राष्ट्रे, विमानकंपन्या आणि प्रवाशांना एक हमी पुरवली जाते आणि मोठी जोखीम हाताळली जाऊ शकते. बाहेरच्या देशातील प्रवाशांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्याचा ताण कमी करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना चाचणी करून येणे अनिवार्य करण्याबद्दल अनेक देश विचार करू शकतात.”
कोविड-१९ सॅम्पल कलेक्शन सेवा ही व्हिसा अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेशी निगडित नाही आणि तिचा व्हीएफएस ग्लोबलच्या व्हिसा अर्ज प्रक्रियेवर किंवा व्हिसासंदर्भातील निर्णयावर काहीच प्रभाव पडणार नाही. व्हिसाबाबतचा निर्णय हा पूर्णपणे संबंधित राष्ट्राच्या अखत्यारीत येतो. ग्राहकांनी आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी संबंधित राष्ट्राने जारी केलेल्या सर्व प्रवासविषयक सूचना पडताळून बघाव्यात असा सल्ला आम्ही देतो.
सॅम्पल घेण्याची सेवाही एका त्रयस्थ सेवा पुरवठादारामार्फत पुरवली जात आहे. ही त्रयस्थ यंत्रणा व्हीएफएस ग्लोबलच्या मालकीची किंवा त्यांच्याशी संबंधित नाही. व्हीएफएस ग्लोबलची भूमिका ही ग्राहकांना चाचणीसाठी अपॉइंटमेंट बुकिंगमध्ये मदत करण्यापुरती मर्यादित आहे.
व्हीएफएस ग्लोबल विषयी
व्हीएफएस ग्लोबल ही जगातील सर्वांत मोठी व्हिसा आउटसोर्सिंग आणि जगभरातील सरकारे व राजनैतिक मिशन्ससाठी काम करणारी तंत्रज्ञान सेवेतील स्पेशालिस्ट कंपनी आहे. व्हीएफएस ग्लोबलचे पालकत्व स्विस आहे आणि स्वीडनमधील स्टॉकहोम येथे मुख्यालय असलेल्या ईक्यूटी या आघाडीच्या जागतिक खासगी इक्विटी फर्मची ही पोर्टफोलिओ कंपनी आहे. पाच खंडांतील १४४ देशांमध्ये ३३९९ अॅप्लिकेशन सेंटर्समार्फत ही कंपनी काम करते आणि २००१ मध्ये स्थापना झाल्यापासून ३० जून २०२० या तारखेपर्यंत कंपनीने २२४ दशलक्षांहून अधिक व्हिसांवर प्रक्रिया केली आहे. व्हीएफएस ग्लोबल ही ६४ क्लाएंट सरकारांसाठी विश्वासाचा सहयोगी आहे.
