Thursday, June 11, 2026
PUNE

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातर्फे वारजे माळवाडी येथे कोरोना योध्दा सत्कार समारंभ

पुणे, दि. १९ – लॉकडाऊन काळात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा , संस्थांचा राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या वतीने वारजे माळवाडी येथे सत्कार करण्यात आला.

कर्वे समाज संस्था , अल-मदाद ट्रस्ट उत्तमनगर , रहबर ट्रस्ट कोथरूड ,ऋणानुबंध सेवा संस्था वारजे,
तुफेल शेख , आलम पठाण, सचिन दांगट ,
चंद्रशेखर देशमुख,पैगंबर शेख, पराग ढेणे , साईनाथ जोशी, राम सोनवणे, निलेश बराटे, महेश बराटे, रफिक शेख, युसूफ पटेल, सरफराज सय्यद, प्रवीण दांगट, शंतनु चौधरी, अभिजित निंबाळकर , सार्थक साळुंके यांचा सन्मान करण्यात आला .

कार्यक्रमास काका चव्हाण (अध्यक्ष खडकवासला विधानसभा संघ, राष्ट्रवादी काँग्रेस ) इक्बाल शेख ( निरीक्षक , कॅन्टोंमेंट ) दयानंद इरकल, अजय खतदेव , हे ऊपस्थित होते . या कार्यक्रमाचे नियोजन पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे ऊपाध्यक्ष जावेद शेख यांनी केले .

‘कोरोना योध्दे हे समाजाचा कायमस्वरूपी आधार आहेत, यापुढेही ते कर्तव्य बजावत राहतील, ‘ असे उद्गार पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे ऊपाध्यक्ष जावेद शेख यांनी यावेळी बोलताना काढले.

कोरोनामुळे भारतव्यापी लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतही दिनदूबळ्या व गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप तसेच शासकीय यंत्रणा व पोलीस बांधवांना मदत केलेल्या काही संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्यांची दखल घेऊन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पुणे जिल्ह्यातील पहिल्याच सत्काराचे सर्व सत्कारार्थीनी कौतुक केले .

…………………………………………
(Media co ordination : Prabodhan Madhyam- News Agency. *Deepak Bidkar* 9850583518 *Gauri Bidkar.)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading