Wednesday, June 10, 2026
ENTERTAINMENTTOP NEWS

दृष्यम, लय भारी फेम सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

हैदराबाद, दि. १८– प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने हैदराबादमधील इस्पितळात निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं त्यांची प्रकृती चिंताजनक होती सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. यात अजय देवगणचा ‘दृश्यम’, इफान खानचा ‘मदारी’, जॉन अब्राहमचा ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं. डोंबिवली फास्ट , रितेश देशमुखचा लय भारी या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. याशिवाय त्यांनी अभिनयातही आपलं नशिब आजमावलं होतं. भावेश जोशी सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading