Thursday, May 14, 2026
MAHARASHTRA

आज ११ हजार ८१३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात १ लाख ४९  हजार ७९८  ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

 पुण्यात दिवसभरात १०९१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

मुंबई, दि.१३: राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले ११,८१३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४१३ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०० (४८), ठाणे- १९६ (१३), ठाणे मनपा-२२७ (९),नवी मुंबई मनपा-३३३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३४५ (१३),उल्हासनगर मनपा-३९ (८), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (८), मीरा भाईंदर मनपा-१४६ (५), पालघर-१७२ (२), वसई-विरार मनपा-२१३ (१०), रायगड-३१७ (९), पनवेल मनपा-१८९ (६), नाशिक-१९५ (६), नाशिक मनपा-६६९ (८), मालेगाव मनपा-६२ (१),अहमदनगर-२९९ (३),अहमदनगर मनपा-२२९ (५), धुळे-६५ (३), धुळे मनपा-३३ (२), जळगाव-४१२ (१२), जळगाव मनपा-८६ (३), नंदूरबार-८८ (१), पुणे- ३९६ (२५), पुणे मनपा-११४८ (४८), पिंपरी चिंचवड मनपा-८४८ (१९), सोलापूर-२६८ (५), सोलापूर मनपा-५१ (१), सातारा-३२० (२०), कोल्हापूर-७२४ (२२), कोल्हापूर मनपा-११३ (१४), सांगली-७९ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४४ (७), सिंधुदूर्ग-२ (१), रत्नागिरी-६१ (२), औरंगाबाद-१६९, औरंगाबाद मनपा-१४३ (१), जालना-८१ (२), हिंगोली-३३ (२), परभणी-२० (२), परभणी मनपा-४२ (१), लातूर-१३८ (६), लातूर मनपा-८३ (५), उस्मानाबाद-२०७ (९), बीड-१२० (३), नांदेड-५७ (२), नांदेड मनपा-१९ (२), अकोला-१९, अकोला मनपा-१४ (२),अमरावती-१४, अमरावती मनपा-६१ (२), यवतमाळ-७९ (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-३४ (१), नागपूर-१२३ (३), नागपूर मनपा-४२० (१२), वर्धा-१४, भंडारा-१२, गोंदिया-३२ (२), चंद्रपूर-६७, चंद्रपूर मनपा-२२ (१), गडचिरोली-३४, इतर राज्य २१.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.

पुणे १३ ॲागस्ट 2020…….- दिवसभरात १०९१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ११५६ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ४६ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.११ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ७३७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ७०३२६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४७१२.
– एकूण मृत्यू -१६५६.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ५३९५८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६३३५.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading