महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था त्वरित चालु करा,वंचित बहुजन आघाडीचा इशारा
पुणे, दि.१२ – लॉकडाऊन काळामध्ये शहर अंतर्गत तसेच जिल्हा अंतर्गत वाहतुक व्यवस्था बंद करण्यात आल्याने सामान्य जनतेचे हाल होत आहेत.त्यातुनच एस.टी महामंडळदेखिल आर्थिक संकटात सापडले असुन कामगारांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार लटकते आहे.
कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे पालन करुन वाहतुक व्यवस्था पुर्ववत सुरळीत करावी याकरिता वंचित बहुजन आघाडीकडून डफली बजावो आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.
यावेळी एस.टी. महामंडळां कडून तसेच पी.एम.पी.एम.एल. कडुन सर्व गाड्या लवकरात लवकर चालु करणार असल्याचे आश्चासन देण्यात आले.
पुणे शहरात स्वारगेट एस.टी विभागिय कार्यालय , पीएमपीएल डेपो त्याचप्रमाणे हडपसर डेपो,कोथरुड डेपो,पुणे स्टेशन डेपो अशा विविध ठिकाणी आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी,महासचिव जितेंद्र जाधव,प्रसिध्दी प्रमुख दिपक ओव्हाळ,प्रदेश सदस्या रोहिणी टेकाळे,निर्मला वनशिव, गौतम ललकारे,किरण कदम,ज्ञानेश्वर चव्हाण,विवेक लोंढे,प्रभाकर सरोदे,शाम गोरे,संजय कांबळे, पितांबर धिवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
