Monday, August 31, 2026
PUNE

डॅशबोर्डवरील माहितीत तफावत; सौरभ राव यांची कबुली

पुणे, दि. 11 – महापालिकेकडून दैनंदिन कोरोनाचा अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांची माहिती भरताना प्रयोगशाळांकडून दूरध्वनीवरुन माहिती घेतली जाते. तसेच पुण्याबाहेरील उपचारांसाठी शहरात आलेल्या रुग्णांची अनेकदा माहिती दिली जात नाही. परिणामी महापालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून देण्यात येणार्‍या दैनंदिन कोरोना अहवालात मोठ्या प्रमाणात तफावत आढळते, अशी कबुली विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना रुग्णांची, सक्रिय रुग्णांच्या माहितीमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रशासनाकडून प्रथमच कबुली देण्यात आली. खासगी प्रयोगशाळांकडून उशीराने दिली जाणारी माहिती, प्रयोगशाळांकडून दूरध्वनीवरुन माहिती घेण्यात येत असल्याने होणार्‍या मानवी चुका, रुग्णांची माहिती भरताना (डाटा एन्ट्री) होणारी गडबड अशी विविध कारणे असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी दिली.
खासगी प्रयोगशाळांकडून सकारात्मक रुग्णांची माहिती उशीरा कळवली जाते. राज्याच्या आरोग्य खात्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पांद्वारे (आयडीएसपी) कोरोना रुग्णांची माहिती संकलित करण्यात येते. आयडीएसपीकडून पुणे शहराची दिली जाणारी माहिती आणि पुणे महापालिके कडून दिली जाणार्‍या अहवालात तफावत येत होती. त्यावर खासगी रुग्णालयांकडून उपचाराअंती बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची माहिती ई-सूचनाफलकावर (डॅशबोर्ड) अद्यायावत करण्यात येत नसल्याने तफावत येत असल्याचा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading