पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची दिल्लीत उपसचिव पदावर बदली

पुणे, दि. ४ – जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, ते पुढील चार वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत.
