पी ए इनामदार एज्युकेशन ट्रस्टच्या तिन्ही शाळांचा शंभर टक्के निकाल

पुणे, दि. २९ – पी ए इनामदार एज्युकेशन ट्रस्ट च्या वडगाव शेरी येथील तिन्ही शाळांचा निकाल दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. लेडी ताहेरुन्निसा इनामदार इंग्लिश मिडीयम हायस्कुल मध्ये दिव्या संदीप गावडे हिने ८७ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तस्मिया जमादार हिने ८३ टक्के गुण मिळवून लेडी ताहेरुन्निसा इनामदार उर्दू मिडीयम हायस्कुल मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. लेडी ताहेरुन्निसा इनामदार मराठी मिडीयम हायस्कुल मध्ये प्रणय लताम्बळे याने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,अबेदा इनामदार ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्बास शेख यांनी अभिनंदन केले.
