fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRA

१० वी चा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार

पुणे, दि. २८ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (२९ जुलै) रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे उत्तरपत्रिका तपासण्यातील अडचणींमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. गेल्या काही दिवसांत आयसीईएसई आणि सीबीएसईचे दहावी-बारावीचे निकाल तसेच राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे पालक-विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. -यंदा दहावीच्या परीक्षेला १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी बसले होते.

http://www.mahresult.nic.in, http://www.sscresult.mkcl.org, http://www.maharashtraeducation.com या वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. तसेच त्यांना निकालाची प्रतही घेता येईल. ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत गुणपडताळणीसाठी, तर ३० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading