Tuesday, June 23, 2026
PUNE

आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आणि लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी समारोप समारंभानिमित्त नंदेश उमप आणि सुबोध भावे यांचा होणार सन्मान

संदीप खरे यांच्या हस्ते ‘सांस्कृतिक पुणे’ या डिजीटल व्यासपीठाचे अनावरण

पुणे, दि. २८ – आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दि सांगता समारंभानिमित्त संवाद पुणे आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता, कमिन्स हॉल, पत्रकार भवन येथे पार्श्वगायक नंदेश उमप यांना पुरस्कार देऊन सन्मनित करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेडगे, सुनील कांबळे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एनवायसीएमचे चेअरमन आणि समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे आणि संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी कवी संदीप खरे यांच्या हस्ते ‘सांस्कृतिक पुणे’ या डिजीटल व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना संदिप खरे म्हणाले की, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या डिजीटल व्यासपीठाद्वारे कलाकार आणि श्रोते यांच्यात दुवा साधला जाईल. करोनाच्या पार्श्वभुमीवर पुणेकर रसिकांसोबतच महाराष्ट्रासह, देशातील सर्वच पातळ्यांवरील नागरिकांना नाईलाजाने घरातच थांबावे लागत आहे. त्यांमुळे त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्याच्या दृष्टीने संवादने उचलले हे पाऊल भविष्याची दिशा घेणारेच आहे. करोना संकाटामुळे अडचणीत आलेल्या कला क्षेत्राला हे व्यासपीठ नवसंजिवनी देण्याचे काम करेल यात शंका नाही.’

राजेश पांडे म्हणाले की, ‘करोनाच्या पार्श्वभुमीवर उद्भवलेल्या या संकटाकाळात काही तोटे झालेत तर काही पाऊले पुढे देखील टाकली गेली आहेत. आज सांस्कृतिक पुणे या डिजीटल व्यासपीठाच्या बोधचिन्हाचे अनावरण हे पुढे उचलेल्या पावलांपैकीच एक पाऊल आहे. या व्यासपीठावर डिजीटल बालगंर्धवच जणू अवतरणार आहे. कार्यक्रमांची रेलचेल खुंटल्यामुळे
गेले चार महिने पुण्यातील सांस्कृतीक क्षेत्राला आलेली मरगळ झटकली जाईल याबद्दल आम्हांला विश्वास आहे.’

पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत माहिती देतांना समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे म्हणाले, रस्कार वितरण सोहळ्यानंतर पार्श्वगायक नंदेश उमप यांचा लोककलेतील प्रवास प्रसिद्ध संवादक मिलींद कुलकर्णी गप्पांमधून उलगडून दाखविणार आहेत. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दि समारोप सांगता समारंभानिमित्त संवाद पुणे आणि समर्थ युवा फौऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता,कमिन्स हॉल, पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे ‘लोकमान्यांचे तेजस्वी जीवन’ या विषयावरील कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे त्यांनी चित्रपटात साकारलेल्या ‘लोकमान्य’ या भुमिकेविषयीचे अनुभवकथन ‘मी आणि लोकमान्य’ या कार्यक्रमाद्वारे करणार आहेत. तसेच यावेळी लोकमान्य टिळक यांची भूमिका सक्षमपणे पेलल्याबद्दल खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते भावे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

संवाद पुणे चे सुनील महाजन यांनी सांस्कृतिक पुणे द्वारे सादर केल्या जाणा-या भविष्याकालीन कार्यक्रमांचा आढावा घेत हे व्यासपीठ निर्माण करण्यामागची भुमिका विषद केली तर संवाद पुणे च्या निकिता मोघे यांनी पत्रकार परिषदेस उपस्थितांचे आभार मानले.

या दोन्ही कार्यक्रमांची मूळ संकल्पना संवाद पुणेचे सुनील महाजन यांची असून एनवायसीएमचे चेअरमन आणि समर्थ युवा फौऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन संवाद पुणेच्या निकिता मोघे यांनी केले आहे. हा संपुर्ण कार्यक्रम सांस्कृतिक पुणे या फे या फेसबुक पेज वर लाईव्ह पहायला मिळणार आहे. याचा आस्वाद रसिकांना फेसबुक, इन्स्टाग्राम, टि्वटर आणि यूट्यूब अशा समाज माध्यमांवर घेता येणार आहे. त्यासाठी https://www.facebook.com/Sanskrutik-Pune-103479798123351 आणि https://instagram.com/sanskrutikpune?igshid=13fzenajrhp3r आणि https://twitter.com/PuneSanskrutik आणि https://www.youtube.com/channel/UCH4NOHBCjlMwp7AN4E28ESw/?guided_help_flow=5 येथे भेट द्यावी.
हे कार्यक्रम करोनाच्या पार्श्वभुमीवर होत असल्याने शासनातर्फे आखून दिलेल्या शासकीय नियमातच संपन्न होणार आहे, असेही आयोजकांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading