अनुराग कश्यप-रणवीर शौरीमध्ये ट्विटर वॉर
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद सुरू झाला. या वाद वाढताना दिसत असून इंटस्ट्रीमधील प्रत्येक कलाकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. रोज कोणत्या कोणत्या सेलिब्रिटींमध्ये घराणेशाही वादावरून ट्विटर वॉर सुरू असते. आता अभिनेता रणवीर शौरी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप या दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नंतर आता अभिनेता रणवीर शौरी याने बॉलिवूडच्या घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. रणवीरने ट्विट करत लिहिले आहे की, ‘या इंडस्ट्रीत अनेक स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक आहे जे आता मुख्य प्रवाहातील बॉलिवूडचे गुलाम झाले आहेत. हे तेच लोक आहेत जे नेहमी लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता सरकारबाबत उघडपणे बोलत असतात, जोपर्यंत या बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत हे बोलत असतात. हा ढोंगीपणा आहे.’ या ट्विटमध्ये रणवीरने कोणत्याही दिग्दर्शकाचे नाव घेतलेले नाही. पण रणवीरचे हे ट्विट वाचून दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्विट केले आहे. त्याने रणवीरचा उद्देशून प्रश्न विचारला आहे.
अनुराग कश्यपने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘रणवीर तुला खरंच असं वाटत का? जर हो असले तर तू मला व्यवस्थित सांग, तुला नेमके काय म्हणालयाचे आहे ते?आणि कोण कोणाचा गुलाम झालाय?’
यावर रणवीरने प्रत्युत्तर दिले की, ‘मला जे म्हणायचे होते ते मी स्पष्टपणे म्हटले आहे. जे मी लिहिले आहे त्यात स्पष्टता नाही असे मला वाटत नाही. कोणाची नाव घेऊन मला कोणावर चिखल उडवायचे काम करायचे नाही आहे. पण काही लोक कुठून आले आहेत याची त्यांना फक्त आठवण करून देतोय.’
हा वाद इथेच संपला नाही. अनुराग कश्यपने अनेक ट्विट करून आपण आउटसाईडर्सना सर्वात जास्त संधी दिल्याचे सांगितले. तसेच त्याने रणवीर अनेक आरोप देखील लावले. सध्या सोशल मीडियावर हे ट्विट वॉर व्हायरल होत आहे.
