fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

1838 पुण्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा विक्रमी आकडा

पुणे, दि. 18 – पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आढळून येत आहे. दोन दिवसात तब्बल 3 हजार 288 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी दिसभरात 1 हजार 838 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 774 जण कोरोनामुक्त झाले, असुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर मागील चोविस तासात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात विविध रुग्णालयात 13 हजार 62 रुग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 35 हजार 878 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभाच्या वतीने देण्यात आली.

१८ जुलै पुण्यातील करोना रुग्ण स्थिती

……….
– दिवसभरात १८३८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ७७४
– बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
एकूण रुग्ण – २१८८१
– आज दिवसभरातील एकूण मृत्यू – १८( ४ मृत्यू पुण्याबाहेरील रुग्ण)
– पुण्यातील एकूण मृत्यू – ९३५
– शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ५४७
– व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ८९
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – ३५८७८
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – १३०६२
– आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या – ६९८१
– आज पर्यंतच्या एकूण करोना चाचण्या -१९८४८९

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading