Saturday, June 20, 2026
PUNE

पुण्याचा विकास व नागरी प्रश्न सोडवण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रमावर भर देणार -आबा बागुल


पुणे, दि. ३० – पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते पदी माझी निवड करून माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल काँग्रेसपक्ष अध्यक्षा  सोनिया गांधी,  खासदार राहुल गांधी, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात ,जेष्ठ नेते पृथ्वीराज  चव्हाण व अशोक चव्हाण,उल्हास पवार  आणि पुण्यातील पक्ष्याचे सर्व नेते पदाधिकारी,नगरसेवक यांच्याबद्दल कृतज्ञता  व्यक्त करतो १९९२ पासून सलग सहा वेळा मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे, पक्षाने अनेक पदांची जबाबदारी माझ्यावर टाकली.  या गेल्या २८ वर्ष्यांच्या अनुभवाचा फायदा पुण्याचा विकास आणि प्रश्न सोडवण्यासाठी नक्की होईल हा मला विश्वास वाटतो 
पुण्यात सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या आधारे नागरिकांच्या हिता  विरुद्धचे निर्णय घेऊ नये याबद्दल मी दक्ष राहिलच याशिवाय काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. त्यांच्याकडून पुण्याचे नागरी प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकास योजना राबविण्यासाठी मोठा निधी मित्र पक्षाच्या सहकार्याने राज्य सरकारकडून आणण्यावर माझा भर राहील.


पुण्याच्या पाच प्रमुख प्रश्नांबाबत मी विशेष जागृतीने व आग्रही भूमिकेतून काम करणार आहे. पुण्याची कोरोना च्या पार्श्वभूमीवर  पुण्याची सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करून पुणे सिटिझन्स हेल्थ ग्रीन कार्ड सारखी योजना राबविणे, इंदिरा संजीवनी झोपडपट्टी पुनर्वसन  योजनेस मान्यता घेऊन झोपडपट्या  आणि झोपडपट्टीवासियांचे सक्षम पुनर्वसन करणे , पुण्याच्या वाहतूक प्रश्नावर  रामबाण उपाय असणाऱ्या हाय कपॅसिटी मास ट्रानझिट रोड (एचसीएमटीआर) हा मूळ प्रस्तावित २४ मीटर चा एलेवेटेड मार्ग पूर्ण करून घेणे, तळजाई टेकडी पर्यावरण पूरक हरित कवच निर्माण  व्हावी यासाठी तळजाई विकास प्रकल्प राबविणे आणि जपानच्या जायका  कंपनीतर्फे पुरस्कृत मुठा नदी विकास प्रकल्प पूर्ण क्षमतेने व गतीने राबविणे.पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पाच बाबींवर  मी प्राधान्याने काम करणार आहे. या सोबतच कचरा व्यवस्थापन व  शुद्ध पाणीपुरवठा, प्रदूषण नियंत्रण आणि युवावर्ग  व महिलांना चांगला रोजगार आणि महिलांना सुरक्षित वातावरण याला देखील  काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून मी प्राधान्य देणार आहे. 
पुणेकर नागरिकांचे मोलाचे सहकार्य मला लाभावे आणि पुणेकरांचे नागरी प्रश्न सुटण्यास व पुण्याचा चौफेर विकास गतिमान होण्यासाठी मी करणार असलेल्या कामास पुणेकरांचे आशीर्वाद मिळावेत हि भावना हे पद स्वीकारताना मी व्यक्त करतो. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading