fbpx
Saturday, September 30, 2023
MAHARASHTRA

‘सामना’ मधून पडळकर यांचौ वक्तव्यावरून भाजपवर ‘बाण’

मुंबई, दि. 26 – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खालच्या पातळीवर येऊन टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘बाण’ सोडण्यात आले आहेत.

भाजपने त्यांच्या राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला असून याच्या करामतीमुळे भाजपवर चपला खाण्याची वेळ आली आहे. खडसेंना मागे ठेवून फडणवीसांनी आमदार केलेल्या पडळकरांनी पवारांवर घाणेरड्या शब्दांत भडास व्यक्त केली. त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. भाजपचे गोपीचंद हे राजकारण, समाजकारण यातील महान व्यक्तीमत्व नाही, पण फडणवीसांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरलं. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केलं ते फडणवीस किंवा भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना? असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

“लडाखमधील गलवान खोर्‍यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवलं असं पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितलं. देशावर यापूर्वी संकटं आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील ‘जात’, ‘प्रांत’ यास महत्त्व आणलं जात आहे. हे असे राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे! महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली,” असा जोरदार चोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: