fbpx
Monday, September 25, 2023
PUNE

‘आधुनिक उत्पादन प्रणालीतील संशोधन संधी ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

पुणे, दि. 24 – ‘आधुनिक उत्पादन प्रणालीतील संशोधन संधी ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमला बुधवारी प्रारंभ झाला .सात दिवसीय या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चे आयोजन भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते. भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव अध्यक्ष स्थानी होते.

जर्मनीचे तज्ज्ञ डॉ अलेक्झांडर श्वांट ,डॉ के बी सुतार ,डॉ पी व्ही जाधव ,डॉ व्ही के कुर्तकोटी यांनी मार्गदर्शन केले. देश विदेशातून ७०० संशोधक,अभियंते ,प्राध्यापक सहभागी झाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ आनंद भालेराव म्हणाले,’ कोरोना साथीच्या काळात सर्व जगावर दुष्परिणाम झाले आहेत. जगाच्या अर्थकारणाची रचनाच बदलत आहे. अशावेळी भारताला आत्मनिर्भर व्हायचे असेल तर प्रशिक्षित मनुष्यबळ ,प्रगत तंत्रज्ञान एकत्र आणून पूरक वातावरण तयार करावे लागेल.उत्पादन क्षेत्रासाठी भारत नेहमीच पहिली पसंती राहिलेला आहे. यापुढे गुणवत्तेची कास धरून अजून उत्तम उत्पादने जगाच्या बाजारपेठेत आणावी लागतील. त्यातून भारत हा ‘ मॅन्युफॅक्चरिंग हब ‘ म्हणून उदयास येईल. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी गुणवत्तापूर्ण प्रक्रिया पुढे आणाव्या लागतील. ग्राहकांच्या कमी झालेल्या मागण्या आणि इतर घटकांचा विचार करावा लागेल. हायब्रीड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी चा वापर करावा लागेल ‘.
जर्मनीतील हायब्रीड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रातील ‘आधुनिक उत्पादन प्रणालीतील संशोधन संधी ‘ विषयावर जर्मनीचे तज्ज्ञ डॉ अलेक्झांडर श्वांट यांनी मार्गदर्शन केले. फॅकल्टी प्रोग्रॅमचे सह प्रमुख डॉ के बी सुतार यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ पी व्ही जाधव यांनी आभार मानले. डॉ व्ही के कुर्तकोटी यांनी सूत्र संचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: