fbpx

कोरोना – राज ठाकरे यांची चिंता वाढली

मुंबई, दि. 23 – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंजवर पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तीन जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होती. आता राज ठाकरे यांच्या दोन्ही वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या आधी सुध्दा कोरोनाने कुष्णकुंजवर एन्ट्री घेतली होती. राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, हे तिन्ही पोलिस करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नुकतंच या सुरक्षा रक्षकांनी करोनावर यशस्वी मात करत करोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. आता राज ठाकरे यांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: