fbpx
Monday, October 2, 2023
MAHARASHTRA

पीक कर्जाचे वाटप व कर्जमाफीची अंमलबजावणी त्वरित करावी यासाठी परभणी भाजपाच्या वतीने सरकारच्या विरोधात निदर्शने

परभणी दि.22 – पावसाळा सुरु झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप ठप्प आहे. महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरु करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरकारच्या विरोधात आज परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यानंतर मा.जिल्हाधिकारी यांना त्वरित पीककर्ज वाटप व कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष नंद भरोसे, मनपा गटनेत्या मंगल मुदगलकर,मनपा सदस्य मोकिंद खिल्लारे,मनपा सदस्य नंदकुमार दरक,संजय शेळके,मंडळाध्यक्ष सुनिल देशमुख,मोहन कुलकर्णी,सुरेश भुमरे,दिनेश नरवाडकर,रितेश जैन,भाजपा तालुकाध्यक्ष संदिप जाधव,भालचंद्र गोरे,आकाश लोहट,बालासाहेब राजुरकर,अंकुश पवार,बंडू झाडे,गणेशसिंह रघुवंशी, प्रविण देशमुख यादी यावेळी उपस्थितीत होते.

Leave a Reply

%d bloggers like this: