fbpx
Tuesday, September 26, 2023
MAHARASHTRA

भारत चीन प्रकरणावर पंतप्रधान खोटे बोलत आहेत- प्रकाश आंबेडकर

पुणे, दि. २० – गलवान घाटी मध्ये भारत आणि चीन या दोन देशांमधील सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत कर्नल संतोष बाबू यांच्यासहित २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले. या हल्ल्यात चीनचे अनेक सैनिक ठार झाले. असे असले तरी भारतीय हद्दीत चीनी सैनिकांनी कुठल्याही प्रकारे घुसखोरी केली नसून त्यांची एकही चौकी भारतीय हद्दीत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की भारतीय हद्दीत चीनी सैनिक यांनी घुसखोरी केली नव्हती तर हाणामारी कशी झाली.

भारत-चीन सीमेवरील गलवान घाटी या ठिकाणी पंधरा-सोळा च्या मध्यरात्री चीनच्या सैनिकांकडून भारतीय सैनिकांवर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कर्नल संतोष बाबु यांच्यासहित २० सैनिकांना वीरमरण आले तर अनेक सैनिक गंभीररित्या जखमी झाले. भारतीय सैनिकांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना चीनचे अनेक सैनिक ठार केले असे असले तरी भारतीय हद्दीत चीनी सैनिकांनी घुसखोरी केली नसल्याचे तसेच भारतात चीनची एकही चौकी नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे बोलत असून लोकांना फसवीत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याबाबत लवकरात लवकर खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: