7 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा वीज कंत्राटी कामगारांचा सरकारला इशारा
पुणे, दि. 16 – महाराष्ट्रात 20 हजार कंत्राटी कामगार हे महावितरण, महापारेषण ,आणि महानिर्मिती या वीज उद्योग कंपनीत काम करतात यांना भरती प्रकिया रद्द करून कायम स्वरूपी सामावून घेण्यासाठी आज पुण्यातील प्रकाश भवन या कार्यालयासह महाराष्ट्रभर वीज कंत्राटी कामगार संघाने काळ्या फिती लावून आंदोलन केले.
आतापर्यंत 9 कंत्राटी कामगार काम करताना मृत्यू मुखी पडले असून 12 कामगार हे जखमी झाले आहेत त्यांना त्वरित सरकारकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे, कंत्राटदार हे कामगारांची आर्थिक पिळवणूक करतात तक्रार करणाऱ्यांना कमी केले जाते. जे कामगार 10 ते 12 वर्षे कंत्राटी कामगार काम करतात त्यांना कायम स्वरूपी समाविष्ट करावे भरती करू नये या बाबत धोरणात्मक निर्णय होई पर्यंत कंत्राटदार विरहित रोजगार कामगारांना कंपनीने द्यावा अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून राज्यातील सगळे कामगार काळ्या फिती लावून काम करणार आहेत प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटना चार टप्प्यात आंदोलन करणार आहे शेवटच्या चौथ्या टप्प्यात दिनांक सात जुलै पासून राज्यातील तिन्ही कंपनीतील सर्व कामगार बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा संघटनेने दिला आहे