fbpx

छोटा शकिलच्या बहिणीचे निधन

मुंबई, दि. १६ – मीरा रोड येथे राहणाऱ्या बहिणीच्या निधनानंतर कुख्यात गँगस्टर छोटा शकीलची मुंब्र्यात राहणाऱ्या दुसऱ्या बहिणीचे मंगळवारी सकाळी राहत्या घरात निधन झाले आहे. एका महिन्यात दोन बहिणीनच्या झालेल्या निधनामुळे छोटा शकीला मोठा धक्का बसला असल्याचे समजते.

हमीदा सय्यद (५७) असे मुंब्र्यात राहणाऱ्या छोटा शकीलच्या बहिणीचे नाव आहे. हमीदा ही ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे आपल्या कुटुंबियांसह राहत होती. मंगळवारी सकाळी तिचे राहत्या घरातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गेल्याच महिन्यात छोटा शकीलची मीरा रोड येथे राहणारी लहान बहिण फमीदा शेख हिची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिला मालाड येथील तुंगा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचे निधन झाले. फमीदाचा पती आरिफ भाईजान हा रियल इस्टेट एजंट आहे. दरम्यान, एकाच महिन्यात एका पाठोपाठ दोन बहिणीच्या मृत्यूमुळे कुख्यात गँगस्टर छोटा शकील याला प्रचंड मानसिक धक्का बसला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: