fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

चंद्रकांत पाटलांमुळे ’असंबध्द व असमतोल विकासाच्या निर्णयांना’ पुणेकरांना सामोरे जावे लागणार- गोपाळदादा तिवारी यांचा इशारा

पुणे दि १६ – भाजप चे पुण्यातील नविन कारभारी मा चंद्रकांतजी पाटील (कोल्हापूरकर) यांनी पुण्यातील जुन्या भाजप नेत्यांना सुट्टी दिली असून, त्यांच्याच सरकारने मंजूर केलेला ‘विकास आराखडा’ देखील मोडीत काढायचे ठरवल्याचेच दिसून येते.. त्यामुळे या पुढे पुणे शहराच्या बाबतीत मनमानी पणाने स्थायीच्या मान्यतेने कोणत्याही “असंबध्द व असमतोल विकासाच्या निर्णयांना” पुणेकरांना सामोरे जावे लागणार असल्याचा धोक्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे  प्रवक्ते गोपाळदादा  तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिला..

 एखाद दूसरा अपवादात्मक व तातडीने करावयाचा रस्ता हा २१० खाली स्थायी च्या मान्यतेने करावा लागतो.. पण तब्बल ३२३ रस्ते सरसकट ६।। व ७।। मीटर चे ९मीटर रूंदी (स्थायी च्या प्रस्तावाने) पकडून तेथील प्लाॅटवर अतिरिक्त ‘टीडीआर’ (विकासाच्या) नांवे करणे हा ‘व्हाईट काॅलर’ भ्रष्टाचारच् आहे.. त्यामुळे रस्त्यांचे ‘रूंदी करण’ विकास आराखडा प्रमाणे नियोजन बध्द न होता शहराचा बकालपणा व अरूंद रस्त्यावर सिमेंट चे जंगल अधिक होण्याचा धोकाच अधिक आहे…! या संदर्भात काॅंग्रेस पक्षा तर्फे मा मुख्यमंत्री, ऊप मुख्यमंत्री, महसूल मंत्री व नगरविकास मंत्री महोदयांना लेखी हरकतीचे पत्र दिले असल्याचे देखील गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. दरम्यान या पत्राची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने घेतली असून हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागास पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ई मेल द्वारे गोपाळदादा तिवारी यांना कळविले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: