fbpx
Thursday, September 28, 2023
MAHARASHTRA

राज ठाकरेंनी केले कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन

मुंबई, दि. १२- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. यामध्ये राज ठाकरेंनी १४ जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे. तुमच्या भागातील नागरिकांना मदत करा त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील, असेही त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले कि, १४ तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. करोनामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. करोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पादाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी माझा सूचनावजा आदेश आहे की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या. याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जीवाची काळजी घ्या. तुमच्या जीवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही. सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: