fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

थेंबे थेंबे कविता संग्रहाचे प्रकाशन

पुणे, दि. ६ – पाणी या विषयावरील पहिल्या वहिल्या कवितासंग्रहाचे काल प्रकाशन झाले. साहित्य भारती, पुणेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर जोशी म्हणाले की, जागतिक जल दिनाच्या निमित्त आम्ही पाणी विषयावर कविता मागवल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ५७५ कविता प्राप्त झाल्या. त्यातील निवडक ८२ कविता संकलित करून थेंबे थेंबे हा कविता संग्रह रफल्स पब्लिकेशन तर्फे प्रकाशित केला.

जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव राजेंद्र पवार यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करताना सांगितले की, देशभरात पाण्याविषयी जागृती होत असताना अशा प्रकारचा पहिला वहिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची कल्पना अत्यंत स्तुत्य आहे. पाणी हे जिवंत आहे, पाण्याला भावना असतात. ‘पाणी वाचवा’ एवढाच संदेश या कवितांमधून मिळत नसून पाण्याविषयीच्या भावना सुद्धा यात व्यक्त झाल्या आहेत. ते म्हणाले की, येत्या काही वर्षात प्रदूषण थांबवण्याबरोबरच जलसंपत्तीचे स्त्रोत दुषित होणार नाहीत याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. कवितासंग्रहाचे संपादन कवि मोहन बेदरकर यांनी केले. पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून एका स्पर्धेद्वारे जलरंगातील चित्रे मागवली होती. साताऱ्यातील नलिनी कला अकादमीचा विद्यार्थी श्री मारुती गोगावले (श्री हे त्याचे नाव आहे) याच्या चित्राला मुखपृष्ठाचा बहुमान मिळाला. अगदी साध्या पद्धतीने हा प्रकाशन सोहळा पार पडला.

प्रकाशनासाठी (डावीकडून) रफल्स प्रकाशनाचे प्रदीप तुंगारे, अभियंता चंद्रमोहन हंगेकर, प्रधान सचिव श्री. राजेंद्र पवार, अभिनव शाळेच्या माजी प्राचार्या व कवयित्री विद्या साताळकर व साहित्य भारतीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर जोशी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: