fbpx

जाणून घ्या, सोनू सूद ची संपत्ती किती?

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनू या मजुरांची मदत एखाद्या देवदूताप्रमाणे करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर त्यांच्या घरी सोडत आहे. आज आपण सोनूची पर्सनल लाईफ आणि त्याच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
सोनूनं 1999 साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सोनू फक्त सिनेमांमधूनच नाही तर जाहिरातींमधूनही खूप कमाई करतो. सोनूच्या वर्तमानातील संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर एका इंग्रजी वृत्तानुसार, सोनू एकूण 130.339 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. सोनू घर मुंबईच्या अंधेरी वेस्टमधील लोखंडवालाच्या यमुना नगर मध्ये आहे.

गेल्या अनेक दिसवांपासून सोनू प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत करताना दिसत आहे. त्यानं स्वत:च मजुरांसाठी बसची व्यवस्था केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं त्याचं जुहूमधील हॉटेल डॉक्टर, नर्स आणि पॅरा मेडिकल स्टाफसहित अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिलं होतं, जिथे हे सगळे झोपू शकतील आणि विश्रांती घेऊ शकतील.

Leave a Reply

%d bloggers like this: