fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

तुळशीबाग 5 जून पासून सुरु होणार

‘तुळशीबाग’ सुरु करण्यासंदर्भातील प्रस्तावावर महापालिका अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा झाला

पुणे, दि. 1- शहरातील उपनगरे आणि इतर भागातील बाजारपेठ, दुकाने आता हळूहळू सुरु होत आहेत. मात्र, तुळशीबाग कधी सुरु होणार..? हा महिलावर्गासह अनेकांच्या मनातील प्रश्न आहे. याच प्रश्नावरील उत्तर शोधण्यासाठी आज आणखी एक पाऊल पुढे पडले. तुळशीबागेतील बाजारपेठ सुरु व्हावी, यासाठी व्यापारी संघटनेने दिलेल्या प्रस्तावाची शनिवारी (दि. ३० मे) महानगरपालिकेच्या अधिकारी – पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून आयुक्तांचा अध्यादेश उद्या मिळणार आहे.शुक्रवार पासून (दि. 5 जून) तुळशीबागेतील सुमारे 50 टक्के दुकाने सुरु होऊ शकतील.एका दिवशी संपूर्ण एक बाजू आणि दुसरा दिवशी दुसरी संपूर्ण बाजू (p1p2) तसेच दोन पथारी मधे 5 मिटर चे अंतर अशा पद्धतीने सुरू होणार आहे…

या विषयी बोलताना तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडित म्हणाले, तुळशीबागेतील व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे..तुळशीबागेत ग्राहकांची सुरक्षितता व सोशल डिसन्टसिग चे सर्व नियम पाळून व्यवसाय करणार आहेत.स्थायी समिती अध्यक्ष हेमंतभाऊ रासने यांच्या सहकार्याने तुळशीबाग लवकरच पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: