fbpx

जाणून घ्या, तैमुरने सैफला कोणतं नाव दिलं आहे

कलाविश्वातील सर्वात लाडका स्टारकिड कोण असा प्रश्न विचारला तर अनेक जण पटकन तैमुरचं नाव घेतील. अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक तैमुर कायमच चर्चेत असतो. बऱ्याच वेळा सैफ आणि करीना मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांना तैमुरविषयी काही प्रश्न विचारले जातात. अलिकडेच सैफने एक मुलाखत दिली, या मुलाखतीत बोलत असताना त्याने तैमुरविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. विशेष म्हणजे तैमुर सैफला कोणत्या नावाने हाक मारतो हेदेखील त्याने सांगितलं.

तैमुर आता थोडा मोठा झाला असून तो बऱ्यापैकी बोलू लागला आहे. त्यामुळे तो घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आता विशेष नावाने संबोधत असतो. मात्र तो सैफला एका वेगळ्याच नावाने हाक मारतो. साधारणपणे मुलं आपल्या वडिलांना बाबा, पप्पा,अब्बा अशा काही नावाने हाक मारत असतात. मात्र तैमुर यापैकी कोणत्याचं नावाने हाक मारत नाही.

“तैमुर मला पप्पा किंवा डॅडी यापैकी कोणत्याचं नावाने बोलवत नाही, तो मला ‘सर’ म्हणून बोलावतो”, असं सैफने सांगितलं. तैमुरला सांभाळणारी नॅनी, सैफला सर म्हणून हाक मारते. तिचंच अनुकरण तैमुरने केलं असून तोदेखील सैफला सर म्हणूनच बोलावतो

दरम्यान, सैफने या मुलाखतीत तैमुरविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तैमुर आता प्रचंड मस्तीखोर झाला असून सतत घरात काही ना काही उद्योग करत असतो असं त्याने सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: