fbpx
Tuesday, September 26, 2023
NATIONAL

विमान प्रवाशांचे धाबे दणाणले, प्रवासी, कर्मचारी निघाले कोरोनाबधित

नवी दिल्ली, दि. 27 – भारतात गेल्या दोन दिवासांपासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही राज्यांनी याला विरोध दर्शवला होता. आता इंडिगोच्या चेन्नई ते कोईबत्तुर विमानातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह अढळल्याने खळबळ उडाली आहे. याचबरोबर एअर इंडियाचा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह अढळल्याने विमान प्रवास करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

देशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी इंडिगो विमान सेवा कंपनीच्या विमानाने चेन्नई ते कोईबत्तुर हे पहिल्या दिवशी उड्डान केले होते. या उड्डाणातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह अढळला. त्यामुळे त्या विमानातून प्रवास केलेल्या जवळपास 100 प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत इंडिगो प्रशासनाने ‘त्या प्रवाशाला इएसआय स्टेट मेडिकल फॅसिलिटीमध्ये क्वॉरंटाईन केले आहे. प्रवासात त्याच्या शेजारी कोणताही प्रवासी बसला नव्हता. विमानातील कंपनीचे सर्व कर्मचारी 14 दिवस उड्डाण करणार नाहीत.’ असे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे.

या घटनेपाठोपाठ सोमवारी दिल्ली – लुधियाना उड्डाण केलेल्या या एअर इंडियाच्या विमानातील 50 वर्षीय सुरक्षा कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तो मुळचा दिल्लीचा रहिवासी आहे. लुधियानाच्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्याला लुधियानाच्या स्थानिक अलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याच्याबरोबर प्रवास केलेल्या 10 प्रावाशांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: