fbpx

ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं पुण्यात निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. फॅन्ड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या, बोनसाय, छत्रपती शासन, बॅलन्स, वाघेऱ्या अशा अनेक चित्रपटात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये त्यांनी भूमिका केली होती. चित्रपटसृष्टीत ते ‘धुमाळ काका’ या नावाने प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रात येणाऱ्या नव्या कालाकारांचे ‘धुमाळ काका’ मार्गदर्शक होते.

Leave a Reply

%d bloggers like this: