Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

‘दृश्यम २’ चा टीझर ट्विटरवर प्रदर्शित

दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार मोहनलाल ६० वा वाढदिवस केरळमध्ये आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. जन्म दिवसाचे औचित्य साधत त्यांनी चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. तसेच आपल्या ‘दृश्यम २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचा टीझर २० सेकेंदांचा आहे. एंटनी पेरुमबवूर हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत तर दिग्दर्शक जेथु जोसफ यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असणार आहे. सोशल मीडियावर हा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘दृश्यम २’ चित्रपटामध्ये मोहनलाल जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. याचप्रमाणे २०१३ साली मल्याळी भाषेत प्रदर्शित झालेल्या मोहनलाल यांचा ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तर हिंदी मध्ये अजय देवगण याने मुख्य भूमिका साकारली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading