…लवकरच तुळशीबाग सुरु होणार
- सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांनुसार आराखडा होणार
- ईद सण साजरा होईपर्यंत दुकाने न उघडण्याचा निर्णय

पुणे, – शहराच्या उपनगरातील काही दुकाने सुरु झाली असली तरीही ‘तुळशीबाग’ सुरु होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण, ‘तुळशीबाग’मधील बाजार हा सगळा कन्टेन्मेंट झोनच्या परिसराजवळ आहे. येथे काळजी घेऊनच पुढील व्यवहार सुरु करावे लागणार आहेत. त्यासाठी स्वतंत्रपणे आराखडा तयार करायला येथील दुकानदारांच्या संघटनेने सुरुवात केलेली आहे. दुकाने उघडण्याचे वेळापत्रक आणि आराखडा तयार होण्यासाठी पुढच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागेल.
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पालिका आयुक्त शेखर गायकवाड, आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्या बरोबर तुळशीबाग बाजार सुरु करण्याबाबत चर्चा केली . हे अधिकारी आणि पदाधिकारी सकारात्मक असून सर्वांचीच सुरक्षितता लक्षात घेऊनच निर्णय घेतला पाहिजे, यासाठी आग्रह असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
तुळशीबाग येथील बाजारपेठ सुरु करण्यासाठी सगळेच अधिकारी सकारात्मक आहेत. मात्र, सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसारच दुकाने सुरु करायची आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करता येईल याबाबत सध्या नियोजन करत आहोत. दोन महिने पेक्षा अधिक काळ दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान खूपच झाले आहे.तसेच व्यापारी मानसिकदृष्या पण खचलेला आहे. दुकाने चालू झाल्यावर लगेच ग्राहक सुरू होतील असेही नाही त्यासाठी वेळ जाणार आहे परंतु दुकाने उघडल्यावर व्यापारांचे मनोबल वाढेल व सकारात्मक विचार येतील ..मात्र, दुकाने सुरु करताना घाई करण्यापेक्षा आता व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्याही सुरक्षिततेची काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे. म्हणूनच, कोणत्या लेनमधील कोणती दुकाने सुरु करता येऊ शकतील, याचे वेळापत्रक तयार करु. त्यावर महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर तुळशीबागेतील व्यवहार सुरु करता येईल. तूर्तास तरी ईद चा सण साजरा होईपर्यंत दुकाने उघडायची नाहीत, असे ठरले आहे.