fbpx

कोरोना पासून रक्षणासाठी गर्दीच्या ठिकाणी हॅंडसफ्री हॅंड सॅनिटायझर यंत्र बसविणार – अमोल रावेतकर

पुणे – प्रभाग १३ एरंडवणा हॅपी कॉलनी मधील वस्ती विभाग व सोसायटी भागातील नागरिकांनी कोरोना सोबत चा लढा यशस्वी केला असून सर्व लोकप्रतिनिधी,विविध सार्वजनिक मंडळ यांच्या सहकार्याने कोरोनाचा लढा यशस्वी होत असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.रावेतकर ग्रूपच्या सहकार्याने प्रभागातील  सार्वजनिक ठिकाणी हॅंडसफ्री हॅंड सॅनिटायझर यंत्र बसविण्याच्या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी नगरसेवक जयंत भावे,नगरसेवक दीपक पोटे,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी संतोष वारुळे,स्वीकृत सदस्य ॲड.मिताली सावळेकर,ज्ञानदा शाळेचे विश्वस्त बापूसाहेब गोहाड,अप्पा जोशी,विनायक जोशी,मुकुंदराव जोशी,भाजपचे पदाधिकारी राजेंद्र येडे,राज तांबोळी,चंद्रकांत पवार,सुवर्णाताई काकडे,संगीताताई आदवडे,फकीरा शिंदे व इतर मान्यवर  उपस्थित होते.आपला प्रभाग ग्रीन झोन मधे असल्याचा सार्थ अभिमान असून अपवादात्मक स्थितीत १/२ रुग्ण सापडल्याने हा लढा अद्याप संपलेला नसून येणाऱ्या काळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन नागरिकांमधे सुरक्षित अंतर,सार्वजनिक स्वच्छता,सतत हात धुण्याची सवय आणि मास्क चा वापर अत्यावश्यक असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.कोरोना विरुद्ध चा हा लढा दीर्घकाळ चालणार असून यासाठी सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून रावेतकर ग्रूपतर्फे कोथरूड मधील किमान ५० सार्वजनिक ठिकाणी हॅंडसफ्री हॅंड सॅनिटायझर यंत्र बसविण्यात येत असल्याचे अमोल रावेतकर म्हणाले.यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व इतरांचे सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले.आपल्याला आता दीर्घकाळ कोरोना सोबत जगायचे आहे हे जगभरातील घडामोडींचा अभ्यास केला तर लक्षात येते आणि मग कोरोनासोबत जगताना त्याच्यावर मात करून ही लढाई जिंकायची असल्यास सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असून थोडासा हलगर्जीपणा देखील जीवघेणा ठरु शकतो असे या कार्यक्रमाचे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले.यासाठीच येणाऱ्या काळात क्रिएटिव्ह फौंडेशन जनजागृतीवर भर देणार असून मास्क चा वापर,वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे ह्या सवयी अंगीकारण्यासाठी नागरिकांना शिक्षित  करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता वार्ड स्तरीय निधीचा विनियोग सॅनिटायझर व यंत्रांसाठी करण्यास मान्यता द्यावी असे मत नगरसेवक जयंत भावे ,दीपक पोटे,मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले असून,आमची  भूमिका प्रशासनाकडे मांडणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: