कवी मनाच्या नेत्याने दिला थेट मोदींना सल्ला
साताऱ्यातील कवी मनाचा नेता आणि बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला ‘अभिजीत बिचुकले’ नेहमीच चर्चेतअसतो. यापूर्वी सुद्धा बिचकुले अनेक वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांना सल्ला दिला आहे. सध्या बिचकुलेचं हे पत्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
आपल्या पत्रात बिचकुले म्हणाला, ” कोरोनामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचे आदेश द्या… कोरोनाने जगभरात कहर माजवला आहे. 15 वर्षाखालील मुले ही भारताचं भविष्य आहे. या वयात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद करा” असा सल्ला बिचुकलेने पंतप्रधांना दिला आहे.

दरम्यान, अभिजित बिचकुलेवर 2012 मधील साताऱ्यातील फिरोज पठाण यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्याप्रकणी पोलिसांनी अभिजीतला सरळ ‘बिग बॉस’च्या सेटवरूनच अटक केली होती. त्यामुळे बिचकुले मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या झोतात आला.
