fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

श्रीमद राजचंद्र मिशनच्या वतीने आरोग्यसेवकांना २०० पीपीई कीट

पुणे : कोरोना महामारीचा उद्रेक संपूर्ण विश्वात भीती, अनिश्चितता आणि चिंता यांचे वातावरण निर्माण करून समाजात अस्थिरता निर्माण करत आहे. त्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या अध्यात्मिक संघटनेने आपले संस्थापक पूज्य गुरुदेव श्री राकेशभाई यांच्या प्रेरणेने अनेक स्वरूपात मदत कार्य हाती घेतले आहे. 
संस्थेच्या पुणे केंद्रातर्फे आरएसएसच्या ५० स्वयंसेवकांना पीपीई किट्स देण्यात आले आहेत. तर ११० कीटस रुग्णालयात देण्यात आले आहेत. गरजू लोकांना अन्न सामग्रीचे किट्स देखील पुरविण्यात येत आहेत. श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे ब्रीदवाक्य स्वत:च्या सत्य स्वरूपास ओळखा आणि जीवांची निष्काम सेवा करा याचे पालन करीत विश्वभरातील २ हजारपेक्षा अधिक स्वयंसेवक या काळात काम करीत आहेत. 
फ्रंट लाइन्सचे कार्यकर्ते डॉक्टर, परिचारिका, पोलीस ,कचरा व्यवस्थापन कामगार आणि सरकारी अधिकारी यांना पौष्टिक अन्नाची पाकिटे पीपीई मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्यात येत आहे. रोजंदारीवर काम करणा-या मजुरांना अन्नपदार्थ आणि धान्याची किट्स देण्यात येत आहेत. श्रीमद राजचंद्र मोबाइल पशुवैद्यकीय सेवेच्या माध्यमातून लॉकआऊट मुळे उपाशी असलेल्या हजारो भटक्या प्राण्यांना उपचार आणि अन्न पुरवण्याचे काम करीत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: