चित्रपट ऑनलाईन रिलीज करू नका!

कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. लॉकडाऊन मुळे सर्व उद्योग ठप्प झाले आहेत. यामध्ये चित्रपटसृष्टीलाही संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्व चित्रपटांचे शूटिंग थांबले आहे, परिणामी चित्रपटांच्या रिलीज डेटही बदलण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ आणि अभिनेत्री विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट ऑनलाईन रिलीज करण्यात येणार आहे. तेव्हापासून, मल्टीप्लेक्सच्या मालकांनी या बदलाबाबत चिंता व्यक्त केली आहे. नुकतंच पीव्हीआर आणि आयनॉक्स सिनेमाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त कल्याचे दिसून येत आहे. त्यांनी म्हंटलं कि, “आम्हाला असं वाटतं की, फिल्मकाराची मेहनत दाखवण्याचा सर्वात चांगला मार्ग हा आहे की, चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये दाखवला जावा. कोरोनामुळे थिएटर फक्त भारतातच नाही तर जगभरात बंद आहेत. आम्हाला विश्वस आहे जेव्हा सगळं काही ठिक होईल तेव्हा पुन्हा चाहेत थिएटरमध्ये जाऊन सिनेमाचित्रपट पाहतील”. यात पुढं असं म्हटलं आहे की, आम्ही प्रोड्युसर्सना विनंती करतो की, त्यांनी थिएटर सुरू होईपर्यंत चित्रपट ऑनलाईन रिलीज करण्याला स्थगिती देण्याच्या विनंतीवर विचार करतील.’
