Wednesday, June 17, 2026
PUNETOP NEWS

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मंडईच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या १२७ वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.  मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष  राजाभाऊ टिकार यांच्या शुभहस्ते झाली. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. 
यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात,उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सुरज थोरात, विक्रम खन्ना, अजय झवेरी, संकेत तापकीर, साहिल मिसाळ, अथर्व माने, ओमकार थोरात, आशीष थोरात, हर्षल भोर आदी उपस्थित होते. 
आॅनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे. 
महाराष्ट्रभरातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे उत्सवकाळात  २४ तास आॅनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. 
मंडळाच्या www.akhilmandaimandal.org या वेबसाईट वरुन शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
अण्णा थोरात म्हणाले, दरवर्षी उत्साहात आणि सर्व जाती धमार्तील लोकांना सामावून घेऊन अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव साजरा होत असतो. १२७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. परंतु गणेशोत्सव हा समाजासाठी आहे. समाजातील लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आम्ही गणेशोत्सव साजरा करणार आहोत. 


***
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे अधिक काळजी घेण्यात येणार आहे. कमीत कमी गणेशभक्त मंदिरात असतील. यासोबतच प्रत्येक २ तासांनी फॉग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाईज केले जाणार आहे. त्याशिवाय आॅकिसमीटर, आणि थर्मामीटरच्या सहाय्याने प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे.  मंडळात येणाºया प्रत्येकासाठी मास्क बंधनकारक आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading