Thursday, June 11, 2026
MAHARASHTRA

राज्यात आज 11 हजार 88 नवे रुग्ण, 10 हजार 14 कोरोनामुक्त

पुण्यात 924 पॉझिटिव्ह तर 1240 निगेटिव्ह

मुंबई, दि.११ : राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

राज्यात आज २५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४२ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे ११ ॲागस्ट 2020 अपडेट

– दिवसभरात ९२४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १२४० रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात ४० करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.१८ रूग्ण पुण्याबाहेरील.

– ७३५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ६७६५१.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४७०५.

– एकूण मृत्यू -१५९३.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ५१३५३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५३२०.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading