Thursday, June 11, 2026
PUNE

हिंजवडीच्या राम मंदिरात आरती, भाविकांना  खिरापत वाटप

भंगारमाल वेचणाऱ्या बाळू मावशीं धुमाळ यांचा उपक्रम

पुणे, दि. ५ – अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन झाल्याच्या आनंदात भंगारमालाच्या व्यवसायातील उद्योजक असलेल्या बाळूमावशी धुमाळ त्यांच्या माण-हिंजवडी-गवारवाडी खिंडीतील राम मंदिरात ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आरती करून खिरापतिचा प्रसाद वाटून परिसरातील उपस्थित भाविकांचे तोंड गोड केले.

वारकरी संप्रदायातील बाळूमावशीनी याच वर्षी २६ फेब्रुवारी २०२० रोजी राम मंदिर उभारून तेथे राम लक्ष्मण – सीतेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती.याच राम मंदिरमध्ये आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन होत असल्याने हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यानी साखर -खोबऱ्याची खिरापत वाटून परिसरातील उपस्थित भाविकांचे तोंड गोड केले. अशीक्षित असलेल्या बाळूबाई धुमाळ यांनी भंगार मालाच्या व्यवसायातून जमवलेली पुंजी खर्च करून हे मंदिर बांधले आणि साधू संताना बोलावून प्रतिष्ठापनेचा भव्य कार्यक्रम केला होता. या मंदिरासाठी जयपूर वरून मूर्ती आणण्यात आल्या होत्या .करवीर पिठाच्या शंकराचार्यांनी या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती .
रामावर विशेष श्रद्धा असलेल्या बाळू मावशी यांनी अयोध्येतील विवादास्पद भूमीचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला म्हणून आजारी असतानाही आनंदोत्सव साजरा केला होता .त्या वेळी डोळ्यांवर ३ शस्त्रक्रिया झाल्या होत्या ,अशी आठवण बाळू मावशी धुमाळ यांनी सांगितली .
‘कोरोना मुळे मंदिर बंद असले तरी साफ सफाई ,स्वच्छतेसाठी तेथे जावे लागते . वीज नसली तरी जनरेटर लावून पाण्याची व्यवस्था करावी लागते . एकदा मंदिर उभारले की त्याची काळजी महामारी असली तरी घ्यावी लागते . श्रद्धेने आलेली ती जबाबदारी आहे . त्यात मी कमी पडत नाही . कोरोना काळातही माझ्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांसाठी काम करीत असते.’अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या .
सत्तरी ओलांडलेल्या ,आणि वारकरी संप्रदायातील बाळूमावशी यांनी विठ्ठल मंदिर देखील उभारले असून दर वर्षी तेथे हरिनाम सप्ताह करतात . स्वखर्चाने या परिसरातील दिंडी त्या हरिद्वार ,काशीला घेऊन गेल्या आहेत. त्या अयोद्ध्येला ६ वेळा जाऊन आल्या आहेत .राम मंदिर बांधकाम सुरु झाल्यावर परवानगी घेवून त्या अयोध्येला जाणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading