Tuesday, June 16, 2026
PUNE

आर्किटेक्चर शिक्षणासंबंधी समुपदेशनाचे आयोजन

पुणे, दि. ३ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे आर्किटेक्चर पदवी (बी .आर्क ) शिक्षणसंबंधी समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ऑगस्ट पर्यंत दररोज सकाळी ९ ते ३ यावेळेत पात्र विद्यार्थ्यांचे समुपदेशन या महाविद्यालयात केले जाईल . अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या प्राचार्य डॉ. लीना देबनाथ यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

बारावी परीक्षेत पी सी एम विषयांच्या ग्रुप मध्ये ५० टक्के गुण असलेले आणि नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे समुपदेशन घेऊन या क्षेत्रातील शिक्षण आणि कारकिर्दीच्या संधी समजावून घेऊ शकतात .अधिक माहितीसाठी :info@allanaarchitecture.org या ईमेलवर ,9049782974 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा http://www.allanaarchitecture.org या संकेत स्थळाद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading