‘वोहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यु स्पोर्ट्स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेचे २४ ऑगस्टपासून आयोजन !!
पुणे : डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने ‘वोहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यु स्पोर्ट्स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेचे आयोनज करण्यात आले आहे. पुण्यामधील प्रमुख सहा क्लबमधील एकूण ११ संघ आणि ८८ खेळाडू या अनोख्या स्पर्धेत सहभागी होणार असून ही स्पर्धा २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
या स्पर्धेत यजमान डेक्कन जिमखाना क्लब, पीवायसी हिंदू जिमखाना, रॉयल कनॉट बोट क्लब (आरसीबीसी), पुना क्लब, जयराज क्लब आणि कोरिंथिन्स् क्लब या मानांकित क्लबमधील खेळाडू सहभागी होणार आहे. स्पर्धेचे सामने हे सहभागी सर्व क्लबमध्ये होणार आहेत. स्पर्धेची अंतिम पात्रता फेरी (प्ले-ऑफस्) २ ऑक्टोबरपासून डेक्कन जिमखाना क्लब येथे होणार आहेत.
या स्पर्धेच्या फॉरमॅटबद्दल माहिती देताना खंडेलवाल यांनी सांगितले की, या लीगमध्ये ‘होम अँड अवे’ (घरचा सामना आणि बाहेरील क्लबमधील सामना) अशा स्वरूपामध्ये होणार आहे. सहभागी संघ एकदा स्वतःच्या क्लबमध्ये आणि एकदा प्रतिस्पर्धी संघाच्या क्लबमध्ये असे एकमेकांविरूध्द दोनदा सामने खेळणार आहेत. यामुळे संघातील अव्वल किंवा मानांकित खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून न राहता संपूर्ण संघाच्या क्षमतेला आणि निकालाला महत्व मिळणार आहे. याच वैशिष्ट्यामुळे ही स्पर्धा एकाच वेळी अत्यंत चुरशीची आणि उत्कंठावर्धक ठरेल, असा विश्वास वाटतो.
स्पर्धेत पुण्यातील सर्वोत्तम क्यू खेळाडूंचा समावेश आहे. माजी आंतरराष्ट्रीय विजेता व भारताचे प्रतिनिधीत्व केलेले देवेंद्र जोशी, सूरज राठी, विजय नचाणी, विघ्नेश संघवी, कपिल पंजाबी, राजवर्धन जोशी, जयदीप खांडेकर, प्रशांत पवार आणि यश देशपांडे आदि खेळाडूंचा समावेश आहे.
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक देण्यात येणार आहेत.
