नॅचरल्स एनएक्सटी कडून पुण्यात एआय पॉवर्ड ब्यूटी एक्सपिरियन्स सादर
पुणे : भारतातील सलूनच्या सर्वांत मोठ्या शृंखलांपैकी एक असलेल्या नॅचरल्सच्या नॅचरल्स एनएक्सटी या एआय तंत्रज्ञानावर आधारित सलून संकल्पनेचे अनावरण पुणे येथील अमनोरा मॉल येथे करण्यात आले..यासोबतच कंपनी तिच्या २५ वर्षांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा नवीन अध्याय सुरू करत आहे. १,००० सलूनचा टप्पा गाठल्याचा आनंद साजरा करत असतानाच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यातून दक्षिण भारतातून विस्तारलेल्या एका ब्युटी ब्रँडची खऱ्या अर्थाने ‘राष्ट्रीय स्तरावरील ब्रँड‘ म्हणून विकसित होण्याची आणि अल्पावधीतच ४,५०० हून अधिक सलूनपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा दिसून येते.
नॅचरल्स एनएक्सटी सलून चे उद्घाटन नॅचरल्स सलूनचे सहसंस्थापक सीकेके यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संजीव धिमान, सीईओ, नॅचरल्स, संध्या , अमनोरा मॉल , आणि गुंजन सीओओ, नॅचरल्स यांच्या सह अन्य मान्यवर हि उपस्थित होते
नॅचरल्स समूहातील पहिले एआय-पॉवर्ड सलून म्हणून सादर होत असलेल्या नॅचरल्स एनएक्सटीमध्ये अधिक व्यक्तिगत आणि अखंड सौंदर्य अनुभव निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्याचा मिलाफ कऱण्यात आला आहे. कुशल व्यावसायिकांची जागा घेणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे नव्हे तर चांगले आणि अधिक व्यक्तिगत अनुभव देण्यासाठी त्यांना सक्षम बनविणाऱ्या तंत्रज्ञानातूनच सौंदर्याचे भविष्य आकारास येईल, या विश्वासाभोवती ही संकल्पना उभी करण्यात आली आहे.
नॅचरल्स एनएक्सटीच्या माध्यमातून बुद्धिमान सल्ला-विमर्श आणि वैयक्तिकृत सौंदर्य शिफारसींपासून ते एक स्मार्ट आणि अधिक अखंड ग्राहक अनुभव तयार करण्यापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही सलूनच्या प्रवासाचा भाग कसा बनू शकते, याचा शोध घेणे हे ब्रँडचे उद्दिष्ट आहे. आजच्या सौंदर्य ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांचे प्रतिबिंब या संकल्पनेतून पडले आहे. हे ग्राहक व्यावसायिक सौंदर्य कलाकारांच्या कौशल्य आणि मानवी स्पर्शाचा आदर करत असतानाच व्यक्तिगत, सोयीस्कर आणि तंत्रज्ञानाने समृद्ध सेवांच्या शोधात आहेत.
“नॅचरल्ससाठी १,००० सलूनचा मैलाचा दगड गाठणे हा एक निर्णायक क्षण आहे, परंतु आमच्या प्रवासाच्या पुढील अध्यायाची सुरुवात म्हणून आम्ही त्याकडे पाहतो. सौंदर्याचे भविष्य हे तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्याच्या संयोगामध्ये आहे, या आमच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व नॅचरल्स एनएक्सटी करते. आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी मानवी स्पर्श ठेवत असतानाच, आमच्या कलाकारांना एआयद्वारे अधिक सखोल माहितीने सक्षम करावे आणि आमच्या ग्राहकांसाठी अधिक व्यक्तिगत अनुभव तयार करण्यात मदत करावी ही आमची इच्छा आहे,” असे नॅचरल्स सलूनचे सहसंस्थापक सीकेके म्हणाले.
सीकेके पुढे म्हणाले की पुण्यातील लाँच यासाठीही महत्त्वपूर्ण आहे, की नॅचरल्सला दक्षिण भारतातील आपली प्रस्थापित उपस्थिती आणि अनुभव व्यापक राष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. पुण्यातील या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही कंपनीच्या विस्ताराची सुरुवात होत आहे.
नॅचरल्स राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. अशा वेळेस नॅचरल्स एनएक्सटी ही सुलभ, व्यावसायिक सौंदर्याचे तत्त्वज्ञान पुढील पिढीमध्ये आणण्याच्या ब्रँडच्या प्रयत्नाचे प्रतिनिधित्व करते – यात तंत्रज्ञान कलाकाराला आधार देते, ग्राहकांच्या अनुभवासाठी व्यक्तिगतता मध्यवर्ती होते आणि मानवी स्पर्श सौंदर्याच्या केंद्रस्थानी राहते.
