Thursday, June 11, 2026
BusinessLatest News

झेप्टो लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सेबीकडे UDRHP-I केला सादर

UDRHP-1 लिंक: https://www.axiscapital.co.in/contents/Zepto%20Limited%20-%20UDRHP-I-1780938548.pdf

भारतामधील स्केल्ड क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्समध्ये आर्थिक वर्ष 2024 ते आर्थिक वर्ष 2026 या कालावधीत ऑर्डर व्हॉल्यूमच्या दृष्टीने सर्वाधिक वेगाने वाढणारा क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या झेप्टो लिमिटेडने सेबीकडे आपला UDRHP-I सादर केला आहे.

या ऑफरमध्ये 8,010 कोटी रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचे एकूण 11,34,66,566 पर्यतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.

झेप्टोने फ्रेश इश्यू मधून प्राप्त होणाऱ्या निव्वळ निधीचा वापर खालील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे:
1. विद्यमान आणि नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये नवीन डार्क स्टोअर्स उभारून डार्क स्टोअर नेटवर्कचा विस्तार करणे
2. विद्यमान डार्क स्टोअर्ससाठी भाडेपट्टीचे खर्च भागवणे
3. तंत्रज्ञान आणि क्लाउड पायाभूत सुविधा यामध्ये गुंतवणूक करणे
4. ब्रँडविषयी जागरूकता आणि दृश्यमानता वाढविण्यासाठी विपणन आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी झेप्टो मार्केटप्लेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करणे
5. अद्याप निश्चित न झालेल्या अधिग्रहणांद्वारे इनऑर्गनिक वाढीसाठी निधी उपलब्ध करून देणे तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी निधी वापरणे

रेडसीअर अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024 ते आर्थिक वर्ष 2026 या कालावधीत स्केल्ड क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्समध्ये ऑर्डर व्हॉल्यूमच्या दृष्टीने झेप्टो हा भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारा क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ठरला आहे. या कालावधीत झेप्टोच्या ऑर्डर व्हॉल्यूममध्ये सुमारे 119.50% चा CAGR नोंदविण्यात आला असून, हा उद्योगाच्या वाढीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. झेप्टोचा मुख्य भर क्विक कॉमर्स व्यवसायावर असून, वापरकर्त्यांना जलद वितरण सेवा प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये झेप्टोच्या प्लॅटफॉर्मवर (डार्क स्टोअर भौगोलिक स्तरावर) सरासरी 46,623 SKU सूचीबद्ध होते. यामध्ये फळे आणि भाज्यांपासून ते घरगुती इलेक्ट्रॉनिक्स आणि सौंदर्यप्रसाधनांपर्यंत विविध उत्पादनांचा समावेश होता. 31 मार्च 2026 पर्यंत, व्यापारी भागीदारांनी सहज वापरता येणाऱ्या डिजिटल इंटरफेसद्वारे आणि 1,139 डार्क स्टोअर्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून या उत्पादनांची विक्री केली.

कंपनीचे डार्क स्टोअर नेटवर्क अशा बॅकएंड पुरवठा साखळी पायाभूत सुविधेने समर्थित आहे. त्यामुळे तिच्या व्यापारी भागीदारांना उत्पादक आणि ब्रँड्सकडून वेगाने विक्री होणाऱ्या ग्राहक वस्तू (FMCG) ग्राहकांना उपलब्ध करून देता येतात. ही पुरवठा साखळी स्वयंचलित स्वरूपाची असून, 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दररोज सरासरी 3,999,192 युनिट्सवर स्वयंचलित इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे प्रक्रिया करण्यात आली. तसेच, मनुष्यबळ उत्पादकता व्यवस्थापन, किती वस्तूंचा शिल्लक साठा आहे याचा अंदाज आणि ट्रॅकिंग यांसारख्या विविध सुविधांसाठी ही प्रणाली कंपनीच्या स्वतःच्या सॉफ्टवेअरवर कार्यरत आहे.

झेप्टोच्या वितरण नेटवर्कमध्ये “गिग इकॉनॉमी” मॉडेलवर कार्यरत असलेल्या सरासरी 286,670.33 सक्रिय डिलिव्हरी भागीदारांचा समावेश आहे. 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या नेटवर्कने दररोज सरासरी 2,333,488 ऑर्डर्स (OPD) वितरित केल्या. डिलिव्हरी भागीदारांचे व्यवस्थापन कंपनीच्या स्वतःच्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे केले जाते. ते मागणीच्या अंदाजानुसार शिफ्टचे वेळापत्रक निश्चित करते, ऑर्डर पेमेंटसाठी रोख रकमेचे संकलन डिजिटाइज करते आणि डिलिव्हरी भागीदारांना त्यांच्या उत्पनाची तसेच साप्ताहिक देयकांची माहिती उपलब्ध करून देते.

आर्थिक वर्ष 2026 मध्ये, झेप्टोने 22,623.58 कोटी रु. चा निव्वळ महसूल आणि 24,815.54 कोटी रु. चे निव्वळ महसूल मूल्य नोंदविले. आर्थिक वर्ष 2026 दरम्यान कंपनीने 47.97 दशलक्ष वार्षिक व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांना सेवा दिली. याच कालावधीत जाहिरात महसूल 1,635.73 कोटी रु. इतका होता.

कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading