Thursday, May 21, 2026
BusinessLatest News

वी चे नवे इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स यंदाच्या सुट्टीतल्या प्रत्येक प्रवासाचा आनंद द्विगुणित करतील

 

  • नवीन आयआर प्लॅन्स प्रवाशांना देणार अधिक पर्यायलवचिकता आणि सुविधा

प्रमुख टेलिकॉम कंपनी वी ने आज आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन, लवचिक इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स आणले आहेत. परदेशात प्रवास करणाऱ्यांना अधिक सोय, स्वातंत्र्य आणि योग्य मूल्य यांचा लाभ घेता यावा, या दृष्टीने हे प्लॅन्स तयार केले गेले आहेत. आता यामध्ये नवीन ७ दिवस, १४ दिवस आणि २१ दिवसांचे खास पॅक्स समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे ग्राहकांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आणखी उत्तम पर्याय मिळतील.

व्यवसाय, वैद्यकीय उपचार, शिक्षण किंवा सुट्टीत फिरण्यासाठी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकानुसार योग्य रोमिंग पर्याय मिळावा अशी ग्राहकांची इच्छा असते. ग्राहकांची हीच गरज ओळखून, त्यांना परदेशात असतानाही अखंड संपर्कात राहण्यासाठी अधिक सोय, उत्तम पर्याय आणि पूर्ण नियंत्रण वी मिळवून देत आहे.

प्रवासाचा कालावधी कितीही असो, प्रत्येक प्रवाशाच्या सुविधेचा विचार करूनच हे नवीन पॅक्स तयार केले आहेत. बिझनेस मीटिंग किंवा कॉन्फरन्स असो, कौटुंबिक भेट असो किंवा परदेशातील मोठा मुक्काम, वी ग्राहक आता आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकानुसार अगदी परफेक्ट प्लॅन निवडू शकतात.

वी च्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पोर्टफोलिओमध्ये आता तब्बल १७ वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध झाले आहेत. यामध्ये प्रत्येक कालावधीसाठी ट्रूली अनलिमिटेड डेटा मिळतो, ज्यामुळे ग्राहक परदेशात प्रवास करताना कोणत्याही चिंतेशिवाय आणि अधिक विश्वासाने संपर्कात राहू शकतात.

वी ग्राहक अगदी १ दिवसाच्या छोट्या कालावधीपासून ते ३० दिवसांच्या मोठ्या कालावधीपर्यंतचे प्लॅन्स निवडू शकतात – ज्याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

वैधता (दिवस) ४०+ देशअनलिमिटेड लाभांसह १२०+ देशलिमिटेड लाभांसह पॅकची किंमत (रु.)
डेटा (जीबी) व्हॉइस (मिनिटे) एसएमएस डेटा (जीबी) व्हॉइस (मिनिटे) एसएमएस
1 अनलिमिटेड अनलिमिटेड अनलिमिटेड 1 150 100 749
1 1 150 100 1 150 100 649
1 2 150 100 2 150 100 1349
7 अनलिमिटेड अनलिमिटेड अनलिमिटेड 3 300 100 3649
7 2 300 100 2 300 100 2649
7 3 300 100 3 300 100 2849
10 अनलिमिटेड अनलिमिटेड अनलिमिटेड 14 300 100 3999
10 10 300 100 10 300 100 2999
10 14 300 100 14 300 100 3499
14 अनलिमिटेड अनलिमिटेड अनलिमिटेड 21 500 100 4999
14 12 500 100 12 500 100 3599
14 21 500 100 21 500 100 3749
21 अनलिमिटेड अनलिमिटेड अनलिमिटेड 21 600 100 5699
21 14 600 100 14 600 100 3799
21 21 600 100 21 600 100 3849
30 70-FUP 1500 अनलिमिटेड 30 1500 100 5999
30 30 1500 100 30 1500 100 3999

वी चे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला म्हणाले: आज आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या गरजा कमालीच्या बदलल्या आहेत आणि प्रत्येक ग्राहकाच्या वेगवेगळ्या गरजा असतातग्राहकांना परदेशातही जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी अगदी सहज मिळावीहाच वी च्या या लवचिक रोमिंग प्लॅन्समागचा उद्देश आहेयामुळे ग्राहकांना त्यांच्या प्रवासाच्या कालावधीनुसार आणि गरजेनुसार सर्वोत्तम प्लॅन निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेलमग तो बिझनेससाठीचा छोटा प्रवास असोकुटुंबासोबतच्या सुट्ट्या असोत वा परदेशातील मोठा मुक्कामआमचे ग्राहक आता कोणत्याही सुट्टीतअगदी निश्चिंतपणे आणि अखंडपणे जगाशी जोडलेले राहू शकतील.”

 

वी च्या आयआर प्लॅन्सचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • प्रवासाच्या कालावधीनुसार पर्याय: मध्यम ते दीर्घ कालावधीच्या प्रवाशांसाठी अनेक दिवसांचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध.
  • महागड्या बिलाची चिंता नाही: अचानक येणाऱ्या मोठ्या बिलांच्या धास्तीपासून ग्राहकांना सुरक्षित ठेवणारी इन-बिल्ट सिस्टीम.
  • ट्रूली अनलिमिटेड: जगातील महत्वाच्या ४१ देशांमध्ये अनलिमिटेड व्हॉईस आणि डेटा देणारा एकमेव ऑपरेटर.
  • डिजिटल अनुभव: वी ऍपद्वारे कधीही आणि अगदी सहजपणे आयआर पॅक्स खरेदी करण्याची सोय.

हे आयआर पॅक आणून वी ने ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून लवचिकता, पारदर्शकता आणि अखंड डिजिटल अनुभवांवर भर दिला आहे. यामुळे कंपनीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पोस्टपेड पोर्टफोलिओला अधिक मजबूत केले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वी ऍप डाउनलोड करा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading